आमचं ठरलं, कमळ सोडलं, चंदूदादा परत जा! कोथरूडमधून ब्राह्मण सभेचा उमेदवार रिंगणात

19211
chandrakant patil bjp minister says maharashtra
कोथरुड-चंद्रकांत पाटील

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामागचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचेच दिसत आहे. आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची रणनीती आखली असताना आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उमेदवार देऊन त्यांच्यासमोर नवे आव्हान उभे केले आहे. ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश अरगडे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून ‘परत जा, परत जा… चंदूदादा परत जा…’, ‘भाडोत्री उमेदवार चालणार नाही’, ‘आमचं ठरलं, कमळ सोडलं’ अशी घोषणाबाजी केली. भाजपचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतरच पाटील यांना कोथरूडमधून विरोधाला सुरुवात झाली. स्थानिकांकडून विविध मार्गाने पाटील यांचा विरोध करण्यात येत आहे. विविध ठिकाणी फलक लावून तसेच सोशल मीडियावरून हा विरोध दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना सध्या तरी ही निवडणूक जड जाणार असल्याचीच या मतदारसंघात चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या