पूर्ण फी भरलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शुल्क परत करा. त्याचप्रमाणे व्यवसायासाठी कर्जाच्या आलेल्या अर्जांबाबतही लवकरात लवकरच निर्णय घ्या, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले.

मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी महसूलमंत्री, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना 605 अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा असा निर्णय घेतला आहे. असे प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शुल्क भरून प्रवेश दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना देण्यात येणारी उर्वरित रक्कम थेट बँक खात्यांत वितरित करण्यात यावी.

summary : chandrakant patil order to return half amount of fees of maratha students