चंद्रपुरात आशा स्वयंसेविकांचा सन्मान, दोन विशेष योजनांचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बहीण-भावाच्या पवित्र राखी सणाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांसाठी 2 विशेष योजनांचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील गाव खेड्यांपर्यंत पायी पोचत खबरदारी- जनजागृती आणि तपासणी करणाऱ्या आशा स्वयंसेविका भगिनींसाठी पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा योजना आणि आशा किरण योजनांचे लोकार्पण  केले.

आशा सुरक्षा सुविधा योजनेच्‍या अंतर्गत जिल्ह्यातील 2400 आशा स्वयंसेविकाना रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोविड सुरक्षा किट आणि 1100 रुपयांची रक्षाबंधन भेट देण्यात आली. स्थानिक नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात काही आशा स्वयंसेविकांना ही भेट प्रतीकात्मक रूपात देण्यात आली. तर आशाकिरण योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून या स्वयंसेवीकांना दरमहा 200 रुपये मिळणार आहेत.

रक्षाबंधनाचा सण आणि गेले पाच महिने आशा स्वयंसेविका भगिनींनी संकट काळात केलेले अतुलनीय काम बघता हा सन्मान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याप्रसंगी केले. हे सेवेचे -विश्वासाचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासन आणि आशा स्वयंसेविका या दोन्ही बाजूने ठोस प्रयत्नांची गरज असल्याचेही वडेट्टीवार याप्रसंगी म्हणाले.