चंद्रपूरमध्ये स्वच्छता दुतांचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर महानगरपालिकेचे घंटागाडी सफाई कर्मचारी रोज आपल्या परिसरात येऊन आपल्या भागातील कचरा संकलन करतात. कोरोनाच्या सावटात सुद्धा नियमित स्वच्छता ठेवतात. या महासाथीच्या काळात दुर्लक्षित असलेल्या या घटकाप्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी, म्हणून इको-प्रो संस्थेच्या वतीने या स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला. सोबतच धान्य किटही देण्यात आली. चंद्रपूर शहरातील मातानगर, महाकाली वॉर्डमध्ये कार्यरत 26 सफाई कर्मचार्‍यांचा सामूहिक सत्कार केला, सोबतच या सर्वांना भेट म्हणून धान्य किट देण्यात आली.