चंद्रपूरच्या जवानाची आग्रा येथे आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील रहिवासी असलेले जवान निखिल श्रावण बुरांडे (25) यांनी आत्महत्या केली आहे. आग्रा येथील सैन्य कॅन्टोनमेंट परिसरातील राहत्या खोलीत गळफास लावून त्याने आत्महत्या केली. ते तेथे पॅराकमांडो म्हणून कार्यरत होते.  आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज मानोरा येथे त्यांचे पार्थिव शरीर आणले जाणार असून तेथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.