चंद्रपूर – सीपीएल सिजन-7 च्या लोगोचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या चंद्रपूर प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी सातव्या पर्वाच्या नवीन लोगोचे अनावरण वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

लाईफ फाऊंडेशनच्या वतीने सीपीएल या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. आयोजन समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना खेळण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आगामी सिजन -7 जानेवारी महिन्यात आयोजित होणार असून, त्याचा लोगो आज आभासचंद्र सिंग यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.

यावेळी सीपीएल आयोजन समितीचे अध्यक्ष संजय तुमराम सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, डॉ. किशोर भट्टाचार्य, वसीम शेख, कमल जोरा, नाहीद सिद्दीकी, शैलेंद्र भोयर, शहजाद सय्यद यांची उपस्थिती होती.