
चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकट व अनेकांनी लस घेतली असल्याने मागील काही दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. असे असतानाच आता डेंग्यू तसेच इतर आजारांनी तोंड वर काढल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा असून, सद्य:स्थितीत आणीबाणीची वेळ आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रक्तपेढीमध्येही रक्त नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ उडत आहे. दरम्यान, रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी शासकीय तसेच सामाजिक संस्थांना भावनिक पत्र पाठवून रक्तदान करण्याचे आवाहन केले . मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली . त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर आजारी रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. साठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे रक्ताचा सद्य:स्थितीत जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा जाणवू लागला. काही रक्तदाते शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करीत आहेत. मागणी जास्त असल्याने कमी पडत आहे.
A + – 00
A- – 03
AB+ – 01
B+ – 05
B- – 02
O+ – 15
O- – 01

























































