कोरोनामुळे विजेचे संकट, चंद्रपुरात वीज उत्पादन ठप्प

1199

चंद्रपूर येथील वीज केंद्राच्या 32 वर्षांच्या काळात आज पहिल्यांदाच वीज उत्पादन पूर्णपणे ठप्प झालं आहे. राज्यातील विजेची मागणी संचारबंदीनंतर कमी झाल्याने मागील दहा दिवसांपासून उत्पादनात घट केली जात होती. आज पूर्णपणे विजेचे उत्पादन थांबवण्यात आलं. उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी  23 ते 24 हजार मेगावॅट एवढी असते. पण संचारबंदीनंतर ही मागणी 12 ते 13 हजार मेगावॉट एवढी घसरली. त्यामुळं वीज केंद्रावर ही वेळ ओढवल्याचं सांगितलं जातं.

आपली प्रतिक्रिया द्या