चंद्रपूरच्या देवी महाकालीचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक चंद्रपूरच्या देवी महाकालीचे शारदीय नवरात्र 17 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. देशात सध्या कोरोना संकटाची साथ सुरू असल्यामुळे मार्च  2020 पासुन महाकाली मंदीर प्रसार रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. देशातील काही राज्यांमध्ये मंदिरे सुरु झाली असली तरी महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

महाकाली देवस्थान चंद्रपूर, महाराष्ट्रतर्फे सर्व भाविकांना यंदाच्या नवरात्रोत्सवात घरूनच पूजा अर्चना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच काळात हजारोंच्या संख्येने बाहेरगावाहून भाविक दर्शनासाठी दाखल होतात. मात्र यंदा देवीचे सर्व या काळातील पूजाविधी भक्तांविना यथासांग पार पडणार असून भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी करू नये असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या