
घरी विद्युत संच लावण्याकरीता डिमांड काढून देण्यासाठी चंद्रपूर येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने सहा हजार रूपयांची मागणी केली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापडा रचून लाच स्विकारतांना सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडले. श्रीनू चूक्का असे सहायक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार हे जिल्ह्यातील वरोरा शहर येथिल रहीवासी आहेत. सोलर सिस्टीम फिटींग व इलेक्ट्रिशिन आहेत. तक्रारदार यांनी ग्राहकाचा घरी विद्युत संच लावण्याचे काम घेतले होते. संच लावण्यासाठी डिमांड काढण्यासाठी ते वारंवार सहायक अभियंता श्रीनु चुक्का यांच्याकडे गेले. मात्र, त्यांनी प्रत्येकवेळी डिमांड काढण्याचं टाळले.
अखेर सहा हजार रूपयांची मागणी चुक्का यांनी केली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाच स्विकारतांना सहायक अभियंत्यास विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.



























































