चंद्रपुरात ओबीसींच्या मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात महासंघाची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात आज ओबीसींच्या मागण्यांसाठी निदर्शेन करण्यात आली आहे. ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारने 2021 च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, भारतीय संविधानाच्या कलम 243 (ड) (6) आणि कलम 243 (ट) (6) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के राजकीय आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपूर जिल्हा कचेरीसमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर,  यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करून निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ऑड. टेमुर्डे, प्रा. सूर्यकांत खनके अनिल शिंदे, रणजित डवरे, विजय मालेकर, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदू नागरकर, रवी जोगी, कुणाल चहारे सह हजारो ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.