सभापतीचा नवरोबाच निघाला रेती चोर, ऐन निवडणुकीत झालेल्या कारवाईने भाजप अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समिती सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे.

रेती तस्करी करीत असतांना महसूल विभागाने केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पंचायत समिती सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सापडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरूमाची चोरी सूरू असतांना महसूल विभागाने डोळे झाकले आहेत. अश्यात आज पानोरा व राळापेठ नदीपात्रातून रेतीची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले. यातील एक ट्रॅक्टर गोंडपिपरी पंचायत समिती सभापतीचा पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा होता.