दोन जेवणांमध्ये अठरा तासाचे अंतर, आश्रमशाळांसाठी तयार केलेल्या दिनक्रमाला होतोय विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळांसाठी एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये मुलांची दिनचर्या ही सकाळी 6 पासून सुरू होऊन रात्री 9:15 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे प्राथमिक वर्गाची मुलं सतत इतका वेळ कार्यरत राहू शकणार काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे मुलांची जेवणाची वेळ ही दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 6:30 अशी आहे. त्यामुळे दोन जेवणांमध्ये 18 तासांचं अंतर पडताना दिसत आहे.

लहान मुलांसाठी हे वैद्यकीय दृष्टीने कितपत योग्य आहे, हा ही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सोबतच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील किमान 15 तास काम करावं लागणार आहे. याबाबत नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विरोध दर्शविला आहे. आणि मुलांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून हे परिपत्रक परत घेण्याची मागणी केली आहे.