चंद्रपूर – सिंदेवाहीत सेक्सटॉर्शन, अनोळखी मुलीशी व्हिडीओ चॅटींग करीत असाल तर सावधान

सिंदेवाही पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला. सिंदेवाही शहरातील तरुणाला एका अनोळखी तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी चॅटिंग करू लागले. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाली. व्हॉट्स अॅपवर व्हीडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले. तरुणीच्या बोलण्याला भुलून तरुणाने तिला व्हिडीओ कॉलवर अश्लील चाळे करून दाखविले. तिने तो कॉल रेकॉर्ड त्या आधारे ती तरुणाला ब्लॅकमेल करू लागली.

बदनामीच्या भीतीने या तरुणाने काही रक्कम तिला दिली. मात्र, पैशाची मागणी थांबत नसल्याने त्याने अखेर पोलिसांत धाव घेतली आणि प्रकरण चव्हाट्यावर आले. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. सेक्सटार्शनच्या गुन्हा कसा घडतो याबद्दल आता पोलिस नागरिकांना जागृत केले जात आहे.