चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणाऱ्या वाघ बछड्यांचे व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणाऱ्या वाघ बछड्यांचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पावसाळा सुरू होताच ताडोबाचे गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद केले जाते. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातील 16 प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काहीच दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली आहे. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रातही व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटक आनंदी आहेत.

सुनील मेहता नामक पर्यटकाने चित्रित केलेला वाघ बछडे पावसात खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बफर भागातील पावसाळ्यातील अवर्णनीय असल्याचे पर्यटकांचे मत आहे. कोरोनाकाळात व्याघ्र पर्यटनावर संक्रांत ओढविली असताना या व्हायरल व्हिडीओने व्याघ्र  प्रेमींच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या