
बुधवार दुपारच्या सुमारास राजुरा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 155 मध्ये वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजुरा येथील इंदिरा नगर वॉर्डातील मंगेश पैकन कोडापे नावाचा इसम जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अलीकडे तालुक्यात वाघाचे सतत हल्ले होत आहे. आज ही एकाचा बळी गेला यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मागील महिन्यात मूर्ती येथील श्रीहरी साळवे यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्या घटनेला काही काळ उलटतोच तो चिचबोली शिवारात आठवड्यात वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. यामुळे परिस्थिती लक्षात घेता या महिन्यातील जोगापूर देवस्थान यात्रा महोत्सव बंद करण्यात आला आहे.
तसेच गट तयार करून वन कर्मचारीचे रात्र दिवस गस्त घालीत आहेत. परंतु, वाघाची संख्या जास्त असल्याने अपुरे मनुष्य बळामुळे नियंत्रण करणे आव्हान ठरत आहे. त्यातच बुधवारी पुन्हा घटना घडल्यामुळे नागरिकांत संताप वाढून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




























































