तरुणाने कमालच केली! मुली भाव देत नाहीत, पटत नाहीत म्हणून थेट आमदारांना लिहिलं पत्र

मुली पटत नाही, भाव देत नाही म्हणून एका तरुणाने थेट आमदारांना पत्र लिहिले आहे. माझ्यावर घोर अन्याय होत असून मला हे असह्य होत आहे, असे म्हणत या तरुणाने आमदारांनाच पुढाकार घेऊन काहीतरी करावे अशी मागणी केली आहे. तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चंद्रपूर येथील तरुण भूषण जामुवंत राठोड नावाच्या तरुणाने राजूरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांना एक पत्र लिहिले आहे. संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्याने चिंतेची बाब आहे, असे म्हटले आहे. तसेच यामुळे माझा आत्मविश्वास खचला असल्याचेही त्याने म्हटले.

मी खेड्यापाड्यातील रहिवासी असून राजुरा-गडचांदूर येथे येत असतो. परंतु मला मुली भाव देत नाहीत. पटत नाहीत. दारु पिणाऱ्याला गर्लफ्रेंड असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. आमदारांनी विधानसभा क्षेत्रातील युवतींना प्रोत्साहन द्यावे आणि आमच्यासारख्यांना भाव देण्यास सांगावे, अशी मागणी या तरुणाने या पत्रात केली.

आपली प्रतिक्रिया द्या