
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटारी-वाघा सीमेवरील प्रसिद्ध दैनिक बीटिंग रिट्रीट समारंभाच्या वेळेत बदल केला आहे. वाढत्या थंडी आणि कमी दिवसांमध्ये दिवसाचा प्रकाश व पर्यटकांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन नियमांनुसार, हा समारंभ दुपारी 4:30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5:00 वाजता संपेल. पूर्वी वेळ 5:00 ते 5:30 पर्यंत होती.
या बदलाचा उद्देश म्हणजे लवकर सूर्यास्त झाल्यामुळे आणि हिवाळ्याच्या काळात तापमानात झपाटय़ाने घट झाल्यामुळे पर्यटकांना कोणत्याही त्रासाशिवाय चांगल्या वातावरणात या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेता यावा. अमृतसर आणि वाघा बॉर्डरदरम्यान दररोज हजारो लोक रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी जमतात. थंड वारे आणि कमी तापमानामुळे अनेक वृद्ध व मुलांना संध्याकाळी उशिरा होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहणे कठीण होते. नवीन वेळेनुसार, अंधार पडण्यापूर्वी आणि थंडी पडण्यापूर्वी समारंभ पूर्ण केला जाईल. यामुळे लोकांना अंधार पडण्यापूर्वी शहरात परतता येईल आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

























































