आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीएसई (दहावी), आयएससी (बारावी) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 13 आणि 15 मे रोजी दहावीची तर 13 व 15 मे आणि 12 जून रोजी बारावीची परीक्षा होणार नाही.

सीबीएसई बोर्डानंतर कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. बारावीची परीक्षा 8 एप्रिल ते 16 जून तर दहावीची परीक्षा 5 मे ते 7 जूनदरम्यान होणार आहे. दहावी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी विद्यार्थ्यांना किमान 33 गुण तर बारावी परीक्षेतील उत्तीर्णतेसाठी किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक www.cisce.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.