
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपच्या 11 आमदारांविरुद्ध येथील न्यायालयात आज आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलेले आहे. आता या आरोपपत्रावर सुनावणी सुरू करण्याबाबत 25 ऑगस्ट रोजी न्यायालय निर्णय घेणार आहे.























































