छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

1123

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता.

अजित जोगी यांना 9 मे रोजी कार्डियक अरेस्ट आल्यानंतर रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा कार्डियक अरेस्ट आला. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली, मात्र दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. अजित जोगी यांचे सुपुत्र अमित जोगी यांनी यास दुजोरा दिला असून शनिवारी त्यांच्या जन्मगावी गोरैला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती ट्विटरवर दिली.

मुख्यमंत्री बघेल, रमण सिंग यांनी व्यक्त केला शोक
अजित जोगी यांच्या निधनावर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. जोगी यांच्या निधनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बघेल यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी जोगी यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या