सुरक्षा दलाशी चकमक, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी ठार

156
फाईल फोटो

छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एक लाखाचे बक्षीस लावलेला नक्षलवादी ठार झाल्याची घटना बुधवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाचापल्ली गावानजीकच्या जंगलात दुपारी 3 वाजता नक्षलवाद्यांची डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा कमांडो यांच्या संयुक्त पथकाशी चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी काही वेळाने जंगलात पलायन केले. शोधमोहिमेवेळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. याशिवाय देशी बंदुका आणि स्फोटकेही आढळली. मृत नक्षलवाद्याचे नाव काडती मुत्ता असे असून तो जनमिलीशिया कमांडर होता. त्याला पकडण्यासाठी एक लाखाचे बक्षीस सरकारने लावले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या