तुमच्या नंबरवर किती लोक मोबाइल SIM वापरताहेत, या वेबसाइटवरून कळेल माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Aadhar Card आधार कार्डद्वारे लोकांना मोबाइल सिम दिले जाते. अनेक वेळा असे देखील घडते की आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे देखील आपल्याला माहिती नसते. मात्र त्याचा शोध घेता येतो. यासाठी तुम्ही दूरसंचार विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन त्याची मदत घेऊ शकतात.

त्याच्या वेबसाइटद्वारे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे शोधू शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरात नसलेले सिम बंद करण्याची विनंती देखील करू शकता. या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट ( Telecom Analytics for Fraud Management and Consumer Protection ) असे म्हणतात आणि ग्राहक संरक्षण (TAFCOP) असे नाव आहे.

ही सेवा अद्याप संपूर्ण देशात उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा वापरणे खूप सोपे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेपची संपूर्ण पद्धत सांगत आहोत. तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल.

येथे तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर देऊन OTP साठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाइलवर 6 अंकी OTP पाठवला जाईल. तो प्रविष्ट करा आणि तो वॅलिडेट करा. पुढील पृष्ठावर तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल क्रमांक दाखवले जातील. एखादे सिम तुमचे नसेल किंवा तुम्ही ते वापरत नसाल किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या पुढे टिक करून त्यावर खूण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल. जर तुम्हाला आधार रजिस्टर सिमसाठी काहीही करायचे नसेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही.