‘केमिस्ट्री’ गूढकथा संग्रहाचे 27 नोव्हेंबरला प्रकाशन

केमिस्ट्री या गूढकथा संग्रहाचे 27 नोव्हेंबर रोजी प्रकाशन होणार आहे. चित्रकार आणि कवी रामदास खरे यांनी हे पुस्तक लिहिले असून डिंपल पब्लिकेशनद्वारे ते प्रकाशित केले गेले आहे. डिंपल पब्लिकेशन आणि अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अभिनय कट्टा, भास्कर कॉलनी, कोपरी पुलाजवळ, नौपाडा, ठाणे येथे संध्याकाळी 5.30 वाजता या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ लेखिका, अनुवादक डॉ.वसुधा सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून प्रमुख वक्त्या म्हणून कवयित्री, अनुवादक प्रा. सुजाता राऊत या उपस्थित राहणार आहेत. वाचक रसिकांनी या प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.