पाहुणे फिरकीच्याजाळय़ात अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाला फिरकीचे धडे देत मोठय़ा फरकाने पराभूत करणारा पाहुणा इंग्लंड संघ रविवारी स्वत:च हिंदुस्थानी फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकला. चेन्नईतीलच दुसऱया कसोटीत फिरकीवर रविचंद्रन अश्विनने इंग्लिश फलंदाजांना आपल्या बोटाच्या जादूवर नाचवले. या कसोटीच्या दुसऱया दिवशी टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 329 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांतच गडगडला.

अश्विनच्या अफलातून ऑफ स्पिन गोलंदाजीपुढे सलामीवीर डोम सिबली(16), डॅन लॉरेन्स (9), बेन स्टोक्स (18) ओली स्टोन्स (1) आणि स्टुअर्ट ब्रॉड (0) या इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. अश्विनने 23.4 षटकांत फक्त 43 धावा खर्च करीत इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. इंग्लंडचा बेन फॉक्स (नाबाद 42) वगळता इंग्लंडचे अन्य स्टार फलंदाज फिरकीच्या मायाजालात स्वत:ला सावरू शकले नाहीत.