मतमोजणीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा; शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पोलिसांचा लाठीचार्ज

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मोठा राडा झाला. संभाजीनगर येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मतमोजणी सुरू आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी या मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.