…अन् राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी गेले पळून, शिवरायांचा पुतळा हटविण्यास स्थानिकांचा विरोध

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला वेळे येथे असणारा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अतिक्रमणात येत असून, तो हलविण्यात यावा, अशी नोटीस रस्ते विकास मंडळाकडून पाठविण्यात आली होती. मात्र, हा पुतळा हलविण्याला स्थानिकांचा विरोध आहे. शुक्रवारी खासदार उदयनराजे थेट वेळे येथे येताच राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेळे येथे असणारा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा महामार्गावरील संपादित केलेल्या जमिनीमध्ये असल्याच्या नोटीस जागामालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुतळा हलवण्याची नोटीस राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने पाठविली होती. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर पुतळ्याच्या पायथ्याशी शिवभक्तांचा एकच उद्रेक सुरू झाला.

खासदार उदयनराजे यांना ही माहिती मिळताच त्यांनी वेळे येथे धाव घेत हिंमत असेल तर पुतळ्याला हात लावून दाखवा, असा इशारा दिला. खासदार उदयनराजे आल्याचे समजताच, रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळावरून पळ काढला.

 

आपली प्रतिक्रिया द्या