बीएसीच्या विद्यार्थीनीला कॉपी करताना पकडले, शरमलेल्या मुलीने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगढमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीला परिक्षेत कॉपी करताना पकडले. त्यानंतर तिला परिक्षा सेंटरमधून घरी पाठवून पुन्हा पालकांसह बोलावून घेतले. त्यानंतर तिला पालकांसमोर तंबी देत तिच्याकडून माफीनामा लिहून घेतला. या लाजिरवाण्या घटनेने विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बिलासपूर येथील सकरी परिसरातील ही घटना आहे. गंगद्वारी येथे राहणारी ती विद्यार्थीनी चंदेला नगर येथे आपल्या नातेवाईकांकडे राहून शिक्षण घेत होती. बुधावरी विद्यार्थीनीची बीएससीची परिक्षा होती. या पेपर दरम्यान महाविद्यालयीन स्टाफने तिला कॉपी करताना पकडले. ज्यानंतर कॉलेज प्रशासनने तिच्याकडून माफिनामा घेत तिला सोडून दिले. मात्र विद्यार्थीनी या घटनेने निराश झाली होती. त्या घटनेनंतर ती फार शांत शांत राहत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. तिच्याशी त्यांनी बोलण्याचाही प्रयत्न केला मात्र ती याबाबत काहीच बोलली नाही.

बुधवारी दुपारी ती अचानक घरातून बाहेर निघालीय. बराच वेळ ती घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यानंतर घरच्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलीसही तपास करत होते. तेव्हात 6 एप्रिलला सकाळी लोकांनी भरणी परिसरात त्या विद्यार्थीनिने फास घेतल्याचे दिसले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.