
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे ते रावघाट रेल्वे योजनेसाठी काम करणाऱ्या एका खासगी कंपनीचे कर्मचारी होती. नक्षलवाद्यांनी ट्रॅक अंथरण्याचे काम सुरू असताना डिझेलचा टँकर स्फोटकं लावून उडवून दिला. हा हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले असून या परिसरात हे वृत्त प्रसारीत होईपर्यंत चकमक सुरू होती.




























































