
टिक-टॉक व्हिडीओची सध्या क्रेझ आहे. असेच टिक-टॉक व्हिडीओ बनवताना 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
छत्तीसगड मधील कोलियारी येथे नारायणपूर आणि कांकेर गावातील दोन कुटुंब फिरायला गेले होते. मंगळवारी सध्याकाळी सगळ्यांनी बोटीने धरणात फिरायला जायचे असे ठरवले. 4 च्या सुमारास बोटीतून जवळपास 12 जणांनी धरण बघण्यासाठी म्हणून बोटीतून प्रवास सुरू केला. यावेळी फोटो काढणे आणि व्हिडीओ काढण्याचा मोह काही जणांना आवरला नाही.
बोटीत पाठीमागे बसलेल्या लोकांनी टिक-टॉकवर व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे बोटीमध्ये बसलेल्या सर्व लोकांचे मोबाईलकडे लक्ष केंद्रीत झाले. यावेळेस नावाड्याचेही बोटीवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी धरणाच्या पाण्यातील उंच लाटांमुळे बोट पलटी झाली. या अपघातानंतर बोटीतील काहीजण पोहत कसेबसे बाहेर पडले. मात्र बोटीतील एक महिला आणि दोन मुलींचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला.




























































