
>> छाया कदम, अभिनेत्री
खूप दिवसांनी एवढा मोठा ब्रेक मिळाला. हा वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न मला पडला नाही. लॉकडाऊन होण्यापूर्वी माझं चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. सलग नाइट होती. त्यामुळे सगळंच गडबडून गेलं होतं. मी दुपारी चार-साडेचारला घरातून बाहेर पडायचे. साडेपाचला सेटवर पोचायचे. मग रात्री नऊ वाजेपर्यंत शूटिंग सुरू व्हायचं, ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालायचं. मग घरी यायचे. मग पुन्हा झोप… नाश्ता. यामध्ये पुन्हा शूटिंगला जायची वेळ कधी यायची ते काही कळायचंच नाही. माझं दिवस- रात्रीचं सगळं शेड्यूल विस्कटलं होतं. लॉकडाऊनमुळे या सगळय़ाला ब्रेक लागला आणि दिवसा जागणं, रात्री झोपणं असं रुटीन मला परत लावावं लागलं.
लॉकडाऊनच्या दिवसांत जास्तीत जास्त वेळ आईला देता आला. मी, माझी आई आणि नात्यातील गावाकडची एक मुलगी, अशा तिघीच आम्ही घरात राहतो. माझ्या आईचे वय 80च्या पुढे आहे. त्यात ती डिमेन्शियाची पेशंट आहे. आम्ही तिघी एकत्र गप्पा मारतो, खेळतो. जुने अल्बम काढून बघतो. तुम्हाला सांगते, डिमेन्शिया झालेल्या बाईला 25 वर्षांपूर्वी बघितलेली माणसंही आठवतात. सारंच चमत्कारिक वाटतं. माझ्याकडे चित्रपटांच्या काही स्क्रिप्ट आल्या आहेत. त्यांचे वाचनही या दिवसांत केलं. काही वेगळय़ा धाटणीचे सिनेमा आणि वेबसीरिज बघितल्या. बाकी लोक किती भारी काम करतात. आपल्याला अजून मेहनत घ्यावी लागेल. त्यादृष्टीने आपल्या कामात कसा बदल करता येईल याकर विचारही करता आला.
या दिवसांत आपल्या साऱयांना नक्कीच समजून चुकलं असेल की, आपलं कुठं चुकतंय. आपण सतत कामाच्या मागे पळत होतो. आपल्या माणसांसाठी आपल्याकडे वेळ नसायचा. आता संचादाचे पूल साधले गेल्याने एकमेकांचा घट्ट आधार वाटतोय. मी कुठेतरी वाचलं होतं की, या दिवसांत सतत एकत्र राहिल्याने नकरा- बायकोमध्ये विसंवाद होऊन घटस्फोट काढणार. पण माझं निरीक्षण काही वेगळं आहे. माझ्या स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून सांगतेय, की या काळात त्यांच्यातील नातं फुलत गेलंय. काहींनी तर घटस्फोट रद्द करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या चार महिन्यांत एकमेकांना समजून घेण्यात ते यशस्वी झालेत.
दुसरं एक मी बघितलं की, बायकांचा स्वतःवरचा विश्वास फार वाढलाय. मी आत्ता आत्ता कुठे सोसायटीच्या बाहेर जायला सुरुवात केलेय. मी बघते की, महिला भाजी विकताहेत, कुठे छोटं-मोठं काम करताहेत. त्यातून कुटुंबाचा गाडा न डगमगता विश्वासाने चालवू लागल्या आहेत. हे बघायला खरंच मस्त वाटतं.
शेवटी काय, तर संकटं माणसाला खूप काही शिकवून जातात. आज अनेकांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. अनेकांची जवळच्या माणसे दगावली. मात्र लोक दुःख कुरवाळत बसलेली नाही. दु:ख, वेदना मागे सोडून ती धाडसानं तोंड द्यायला उभी राहिलीत. अशा माणसांकडूनच शिकायला मिळतेय.
लोक एकमेकांसाठी उभी राहताहेत
दिवसांचं माझं निरीक्षण आहे, की लोक एकमेकांसाठी उभी राहिलेत. जातीपातीवरून भांडत बसलेली नाहीत. उलट स्वत:ची काळजी घेतानाच आपल्या चुकीची शिक्षा दुसऱयाला व्हायला नको, याचा विचार करू लागली. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यावर लोक प्लाझा दान करून इतरांचे प्राण वाचवताना दिसत आहेत. प्लाझा दान हे अवयवदान इतकंच महत्काचं आहे.






















































