
निसर्गाच्या सौंदर्यात रंगून जात पावसाचा आनंद लुटण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांचा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पावसाच्या सरींचा आनंद घेतानाचा एक खास अंदाज समोर आला आहे. पारंपरिक साडी, नाकात नथ आणि चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद… या रंगीबेरंगी आणि मनमोकळ्या रूपात छाया कदम यांनी पावसाचा आनंद घेत चाहत्यांची मने जिंकली आहेत. समुद्राच्या उडणाऱ्या लाटा आणि कोसळणाऱ्या सरींमध्ये छाया कदम यांचा हा बिंधास्त आणि मनसोक्त आनंद लुटणारा अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.





























































