भयंकर! चिकन टिक्का चहामध्ये बुडवून खाल्ला

1646

गुलाबजाम पाव, गुलाबजामची भाजी, मॅगी खीर असे भयंकर पदार्थ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या पदार्थांना टक्कर देणारा एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला चक्क चिकन टिक्का चहामध्ये बुडवून खात आहे. नेटकऱ्यांनी त्या महिलेच्या या प्रकाराला किळसवानं म्हटलं आहे.

Hey, Guys! When I posted the tea & idli video, u/wromit suggested that I should try “tandoori leg” with tea. I couldn’t find a leg piece, but I found what they call “Tikka.” At first, I wasn’t too sure about it, but after I tried it, I’m really digging the flavor. The after-taste was decent. from r/india

चिकन टिक्का व चहा हे दोन्ही पदार्थ सामान्यत: लोकांच्या आवडत्या पदार्थांच्या यादित येतात. मात्र हे दोन्ही पदार्थ सेवन करण्याची वेळ ही वेगवेगळी आहे. मात्र एका महिलेने या दोन्ही पदार्थांचे कॉम्बिनेशन तयार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या महिलेने चहात बुडवून चिकन टिक्का अधिक चविष्ठ लागत असल्याचा दावा देखील केला आहे. या महिलेला एका नेटकऱ्याने तंदूरी लेग चहात बुडवून खाण्याचा सल्ला दिला होता. त्याचा सल्ला तिने इतका गंभीरपणे ऐकला व हा प्रयोग करून पाहिला.

आपली प्रतिक्रिया द्या