सरन्यायाधीश मीडियावर नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची न्याय संस्था हे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे देशातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांशी एक पवित्र परंपरा जोडलेली आहे. असे असताना देशातील प्रसिद्धी माध्यमांनी कॉलेजियमच्या न्यायमूर्ती नियुक्तीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होण्याआधीच त्यावर टिप्पण्या करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करणे योग्य नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी आपली नाराजी बुधवारी जाहीरपणे बोलून दाखवली. एखाद्या न्यायिक अथवा प्रशासनिक प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय होण्याआधीच त्यावर बातम्या छापणे योग्य नाही, अशी नाराजी सरन्यायाधीश रामण्णा यांनी बोलून दाखवली आहे.