
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईच्या विकास आराखडय़ामध्ये विकासकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि विकासकांमध्ये 10 हजार कोटींचा सौदा झाला असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. ‘माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा दाखल केला जाईल’ असा इशारा या नोटिसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्विच विखे-पाटलांनी मुंबईच्या विकास आराखडय़ात मुख्यमंत्र्यांवर 1 लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांना आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, नाहीतर मानहानीचा दावा दाखल केला जाईल असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.


























































