चिखली शहरात 17 पतसंस्था व 2 बँकांनी एकत्र केली श्रींची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

चिखली शहर हे जिल्ह्यातील अनेक चांगल्या वाईट गोष्टीचे केंद्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून राहत आले आहे. नेहमीच राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार, आध्यात्मिक यासह विविध क्षेत्रात जिल्ह्यात चिखली शहर अग्रेसर राहत आले आहे. यावर्षी प्रथमच चिखली अर्बन बँकेचे कल्पक अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या संकल्पनेतून शहरातील 17 पतसंस्था व दोन बँकांनी एकत्र येत सहकार गणेश मंडळाची स्थापना करत एकजूट दाखवत शाडू मातीच्या गणेश मूर्तिंची स्थापना केली. यावेळी शहरातील सर्व बँकांचे, पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी बंधु उपस्थित होते.

चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे या सहकार गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष म्हणून जवाहर अर्बन सोसायटीचे सरव्यवस्थापक नानोटे, कोषाध्यक्ष म्हणून इंदिरा नागरी सहकाही पतसंस्थेचे सरव्यवस्थापक एंडोले, सचिव म्हणून महेश अर्बन सोसायटीचे सरव्यवस्थापक विलास भाडाइत हे आहेत. यावेळी इंदिरा नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष पप्पुसेठ हरलालका, चिखली नगर संघचालक शरद भाला, बालाजी अर्बन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, संचालक सुदर्शन भालेराव, नारायण भवर, मुंगसाजी महाराज अर्बन सोसायटीचे अध्यक्ष दीपक देशमाने, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडित देशमुख, उपाध्यक्ष किशोर दहिवाळ, संचालक लांडगे, शिवराणा सोसायटीचे संचालक नरेंद्र खेडेकर, आर्यानंदी सोसायटीचे अध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, महालक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष गणेश वायकोस तसेच चिखली अर्बन बँकेचे संचालक भाऊसाहेब शेळके, नरेंद्र लढ्ढा, मनोहर खडके, भिष्म गुरुदासानी, सुनीताताई भालेराव, जनता सहकारी सोसायटीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना गुप्ता, संचालक दिगुमामा शेटे व सर्व बँका पतसंस्थानचे कर्मचारी बंधु उपस्थित होते. चिखली अर्बन बँक, मलकापूर अर्बन बँक, बालाजी अर्बन पतसंस्था, महेश अर्बन पतसंस्था, श्रीराम नागरी अर्बन पतसंस्था, महालक्ष्मी अर्बन पतसंस्था, धनश्री, पंजाबराव देशमुख अर्बन पतसंस्था, गोदावरी अर्बन अर्बन पतसंस्था, तोरणा महिला अर्बन पतसंस्था, इंदिरा नागरी अर्बन पतसंस्था, जवाहर अर्बन पतसंस्था, आर्यानंदी अर्बन पतसंस्था, शिवराणा अर्बन पतसंस्था, मुंगसाजी अर्बन पतसंस्था यांचा समावेश आहे.