चीन हिंदुस्थानला खते, दुर्मिळ माती पुरवणार

चीन आता हिंदुस्थानला खते, दुर्मिळ माती आणि बोरिंग मशीन पुरवणार आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना आश्वासन दिले की, या गरजा पूर्ण केल्या जातील. वांग यी दोन दिवसांच्या हिंदुस्थानच्या दौऱयावर आले. त्यांनी सोमवारी जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही देशांनी परस्पर संबंध पुढे नेण्यास आणि सहकार्य राखण्यास सहमती दर्शविली. चीन हिंदुस्थानसह शेजारील देशांसोबत एकत्र काम करण्यास तयार आहे, असा विश्वास वांग यांनी व्यक्त केला.