चीनने तीन वर्षांत पाडल्या शिंजियांगच्या हजारो मशिदी

चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांना अन्यायाची वागणूक दिली जात आहे. त्यांचा आवाज दडपून टाकण्याची कारस्थाने सतत रचली जात आहेत. शिनजियांगमध्ये मानवी हक्कांची पायामल्ली सुरु असून शिनजियांग प्रातांत तीन वर्षांत 8,500 मशिदी पाडण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. उइगर आणि बहुतांश मुस्लिम भाषिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. लोकांनी त्यांचे पारंपारिक, धार्मिक विधी बंद करावेत, यासाठी दबाव टाकला जात आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटजिक पॉलिसी इन्स्टिटय़ूटनुसार, आतापर्यंत जवळपास 16 हजार मशिदी पाडण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या