चीनमध्ये आयात गोमांस, कोळंबीच्या पाकिटावर आढळले कोरोनाचे विषाणू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारे जग कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करीत असतानाच चीनमध्ये पुन्हा आयात गोमांस आणि कोळंबीच्या पाकिटांवर कोरोनाचे विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे कोरोनाचे विषाणू एखाद्या पाकिटावर आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. ब्राझील आणि सौदी अरेबिया येथून आलेल्या या गोमांस आणि कोळंबीच्या पाकिटांची वुहानमधील आरोग्य विभागाने तपासणी केली असता हे विषाणू आढळून आले. या पाकिटांवरून कोरोना विषाणूचे तीन नमुने येथील प्रयोगशाळेने गोळा केले आहेत जे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या घटनेनंतर चीनच्या संबंधित अधिकाऱयांनी सांगितले की, अन्नाची पाकिटे चीनमध्ये 7 ऑगस्ट रोजी क्विंगडाओ या शहरातून आली आहेत. त्यानंतर ती 17 ऑगस्ट रोजी वुहानकडे पाठवण्यात आली. तेव्हापासून ही पाकिटे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर लगेचच वुहानच्या फॅसिलिटी सेंटरमधील 100 हून अधिक कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली.