चिनी माकडांसोबत पाकडे सरसावले, गिलगिट, बाल्टीस्तानात 20 हजार पाक सैनिक; सीमेवर टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व लडाखच्या सीमेवर चीनी लाल माकडांच्या कुरापती सुरूच असताना आता पाकडे सरसावले आहेत. पाकव्याप्त काश्मिरात गिलगीट-बाल्टीस्तान येथे सीमेजवळ पाकिस्तानी सैन्याने तब्बल 20 हजार सैनिक तैनात केले आहे. चीनच्या इशाऱयावर पाक खेळी करत आहे. दरम्यान, लडाख, जम्मू-कश्मीर सीमेवर टेन्शन वाढले असून, दोघा शत्रू राष्ट्रांनी एकत्र येऊन युद्धाची तयारी केली आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. हिंदुस्थानी लष्कराला हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सीमेवर जवानांच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत.

हिंदुस्थान-चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या तरी तणाव निवळलेला नाही. सात आठवडय़ांपासून प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) स्टँड ऑफ कायम आहे. गलवान खोऱयात हिंदुस्थानचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानने प्रत्युत्तर देताना चीनचे 43 सैनिक ठार झाले होते. या हिंसक संघर्षानंतरही चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. 7 आठवडय़ांपासून लडाख सीमेवर तणाव आहे.

चीनची खेळी; पाकबरोबर बैठक
n जम्मू-कश्मीर सीमेवर हिंदुस्थानविरूद्ध कारवाया करण्यासाठी चीनने ही चाल खेळली आहे. यासाठी पाकिस्तान सरकार आणि लष्कराबरोबर चीनी अधिकाऱयांच्या अनेक बैठका झाल्याचे वृत्त आहे.
n चीनने फुस लावल्यामुळेच पाकडय़ांनी गिलगीट-बाल्टीस्तान भागात अतिरिक्त दोन डिव्हीजन (20 हजार सैनिक) तैनात केले आहेत.
n गिलगीट-बाल्टिस्तान हा पाकव्याप्त काश्मिरातील महत्त्वाचा भाग आहे. हिंदुस्थानच्या सीमेवर कारवाया करण्यासाठी पाकडे गिलगीट-पाकिस्तान मार्गाचा वापर करतात.

जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांसाठी अल बदर, आयएसआयला हाताशी धरले
सीमेवर तणाव वाढवतानाच जम्मू-कश्मीरात दहशतवादी कारवायांसाठी अल बदर आणि पाकची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ला चीनने हाताशी धरले असून, याबाबत चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यात हिंदुस्थानी सुरक्षा दलाने 120 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात बहुतांशी दहशतवादी स्थानिक होते. आता अल बदर आणि आयएसआयला फूस लावून हल्ले घडविण्याचा
चीन आणि पाकडय़ांचा एकत्रित कट आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांनी ‘अल बदर’च्या हालचालींबाबत माहिती दिली होती. दरम्यान, काश्मिर खोऱयासह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंदुस्थानी सुरक्षा दल हायअलर्टवर आहे.

चिनी कंपन्यांना महामार्गावरून हाकलले
टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर पेंद्र सरकारने चिनी कंपन्यांना महामार्गावरून हाकलले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात चिनी कंपन्यांना काम दिले जाणार नाही अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. चीनच्या कोणत्याही कंपनीचा सहभाग राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात नसेल. तसेच चीन सहभागीदार असलेल्या कंपन्यांनाही रस्त्याचे काम दिले जाणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानी कंपन्यांमध्ये कंपन्यांची भागीदारी नसेल. जर कोणी कंत्राट मिळविले तर रद्द करण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

‘एमएसएमई’मध्येही चिनी कंपन्यांना बंदी
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाचा कार्यभारही नितीन गडकरी यांच्याकडे आहे. एमएसएमई सेक्टरमध्येही चीनी कंपन्यांना बंदी आणली जाईल. या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक व भागीदारीला महत्त्व दिले जाईल पण यातून चीनला वगळण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींची वेईबो अॅपला सोडचिठ्ठी
59 चिनी अॅपवर बंदी घातली. त्यातील weibo (वेईबो) अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अकाऊंट होते. पंतप्रधानांनी आज हे अॅप सोडले आहे. तसेच या अॅपवर आधीच्या पोस्टही डिलीट केल्या आहेत. weibo वर पंतप्रधानांच्या 115 पोस्ट होत्या. त्यात 113 डिलीट केल्या. यामध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबरचा फोटोही होता. weibo वर पंतप्रधान मोदींचे 24400 फॉलोअर्स होते.

‘फोर जी’मध्ये चिनी नाही
केंद्र सरकारची दुरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’च्या पह्र जी अपग्रेडशनमधूनही चीनी कंपन्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 4 जी अपग्रेडेशनसाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द केल्या आहेत. आता नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत.