चीन आणि तैवानमध्ये असं काय झालं की युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱयावरून चीन व अमेरिका या जगातील दोन महाशक्ती आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. नॅन्सी पेलोसी या मंगळवारी रात्री तैपेई विमानतळावर दाखल झाल्या. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव टोकाला गेला असून या दोन महाशक्तींमध्ये भयंकर युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

तैवान हा आपला भाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीनकडून अनेकदा तैवान हा चीनपेक्षा वेगळा दाखवून देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असा इशारा दिला जात असतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमध्ये लवकरच तैवान सामिल केला जाईल. मात्र तैवान हा स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. तैवानचे स्वत:चे संविधान असून तिथे लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडले जातात. गेल्या 25 वर्षात अमेरिकेचा एकही उच्चस्तरीय नेता तैवान दौऱ्यावर आला नव्हता अशात आता नॅन्सी पेलोसी यांचा हा दौरा युद्धाची ठिणगी पाडण्यासारखा आहे.

चीनला नॅन्सी पेलोसींचा राग का येतो ?

तैवानचे महत्त्व

तैवान हे एक बेट असून चीनच्या दक्षिण पूर्व तटापासून 100 मैलावर आहे. चीन तैवानला त्याचाच हिस्सा मानतो. तैवान हा फर्स्ट आयलँड चेन असा जो बेटांचा गट आहे त्याचा एक हिस्सा आहे. त्या गटातील बहुतांश बेटं ही अमेरिकेची विदेश निती मानतात. अशात चीनसाठी तैवानचे महत्त्व अधिक वाढते. प्रशांत महासागरात चीनला स्वत:चा दबदबा कायम राखण्यसाठी तैवान गरजेचा आहे.

चीन पासून वेगळा कसा झाला तैवान

चीन व तैवानमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर दुरावा आला असे म्हणता येईल. त्यावेळी चीनमध्ये चीन कम्युनिस्ट पक्षाची सत्ताधारी नॅशनलिस्ट पार्टी (कुओमिंतांग) सोबत सत्तेची लढाई सुरू होती. 1949मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात चीन कम्युनिस्ट पक्षाने देशावर ताबा मिळवला. त्यामुळे कुओमिंतांग पक्षाचे लोकं मुख्य देश सोडून तैवानमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून कुओमिंतांग हा तैवानमधील मुख्य पक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून यांचीच सत्ता आहे.