
जागतिक नौदच्या पॉवरमध्ये चीनने अमेरिका आणि रशिया या बलाढ्य राष्ट्रांना मागे टाकत अव्वल नंबर मिळवला आहे. चीनकडे सध्या 730 युद्धनौका आहेत. ही संघ्या अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. चीनच्या नौदलाला पीपुल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (प्लान) असे म्हटले जाते. चीनकडे 730 युद्धनौका, अत्याधुनिक 61 पाणबुड्या, 3 एअरक्राफ्ट करियर आहेत. आगामी काही वर्षाती चीन आपल्या एअरक्राफ्ट करिअरची संख्या 6 पर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे.
चीनच्या नौदलाकडे फुजियान एअरक्राफ्ट करिअर आहे. याचे वजन जवळपास 80 हजार टन आहे. यामुळे चीनची समुद्रातील ताकद आणखी वाढली आहे. चीनच्या नौदलात 2.5 लाख सैनिक कार्यरत आहे. याशिवाय, 700 हून अधिक विमाने आहेत. ज्यामध्ये आधुनिक जे-15 आणि जे-35 फायटर जेट्सचा समावेश आहे. चीनच्या नौदलाकडे वायजे-18 आणि वायजे-21 यासारख्या अँटी शीप बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत.
पीएलव्ही नेव्हीला आता ब्लू वॉटर नेव्ही म्हणून विकसित केले जात आहे. पीएलए अंतर्गत चीनकडे आता 20 लाख सक्रीय सैनिक आहेत. ही संख्या रशियाच्या सैन्यापेक्षा अधिक आहे. चीनचे संरक्षण बजेट 330 ते 450 बिलियन डॉलरदरम्यान आहे. पीएलए एअरफोर्समध्ये पाचव्या जनरेशनच्या फायटर जेट्सचा समावेश आहे. चीनकडे 600 हून अधिक शस्त्रास्त्रे आणि 1400 हून जास्त बॅलेस्टिक मिसाईल आहेत.






























































