
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
‘चायना पीपल्स असोसिएशन ऑफ फ्रेंडशिप विथ फॉरेन कंट्रीज’ ही चिनी कम्युनिस्ट पक्षाची एक अशी संघटना आहे, जी हिंदुस्थानात थिंक टँक्सना फंडिंग करते. अनेक चिनी सेंटर हिंदुस्थानी युवकांना प्रभावित करत आहेत. न्यूज अॅप्सच्या माध्यमातून चिनी प्रचार वेगाने झाला आहे. अलीकडेच ‘डेली हंट’ या अॅपवर बंदी घालण्यात आली, त्याचे 33 कोटी युजर्स आहेत. अलिबाबा या यूसी न्यूजच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली. चीन समर्थित न्यूज आऊटलेट्स आता अनेक हिंदुस्थानी भाषांत आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही.
हिंदुस्थानच्या डीआरआय म्हणजे पेंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या ग्वांगडाँग ‘ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन’ मर्यादित या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या ‘मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया’ / ‘ओप्पो इंडिया’शी संबंधित चौकशीदरम्यान कंपनीने 4 हजार 389 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविले आहे. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. ओप्पो इंडिया’ ही कंपनी हिंदुस्थानात मोबाईल फोन आणि फोनशी संबंधित वस्तूंचे उत्पादन, जोडणी, घाऊक विक्री तसेच वितरण या व्यवहारांचे संचालन करते. ‘ओप्पो’, ‘वन प्लस’ आणि ‘रियलमी’ यांसह मोबाईलच्या विविध ब्रॅण्डसंदर्भात ‘ओप्पो इंडिया’ कंपनी कार्यरत आहे.
‘डीआरआय’तर्फे ‘ओप्पो इंडिया’ कंपनीच्या विविध कार्यालय तसेच कंपनीच्या महत्त्वाच्या व्यवस्थापन कर्मचाऱयांच्या निवासस्थानी अनेक तपासणी सत्रे राबवली. कारवाईदरम्यान मोबाईल पह्न्सच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी आयात केलेल्या काही सामग्रीच्या वर्णनात चुकीचे दावे करण्यात आल्याचे दर्शविणारे दोषपूर्ण पुरावे सापडले. चुकीच्या दाव्यांमुळे ‘ओप्पो इंडिया’ कंपनीला पात्र नसताना 2 हजार 981 कोटी रुपयांची करमाफी मिळाल्याचे दिसून आले. या चौकशीमध्ये व्यवस्थापन पातळीचे वरिष्ठ कर्मचारी, ‘ओप्पो इंडिया’ कंपनीने नेमलेले देशांतर्गत पुरवठादार तसेच इतरांची चौकशी करण्यात आली. सामग्री आयात करतेवेळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱयांसमोर चुकीचे वर्णन सादर केल्याची कबुली सर्वांनी दिली आहे. असे आढळून आले की, ‘ओप्पो इंडिया’ने चीनमधील पंपन्यांसह विविध बहुराष्ट्रीय पंपन्यांना ‘रॉयल्टी’ तसेच ‘परवाना शुल्क’ या शीर्षकाखाली रक्कम हस्तांतरित केली किंवा तरतूद केली. ‘ओप्पो इंडिया’तर्फे भरण्यात आलेली ‘रॉयल्टी’ तसेच ‘परवाना शुल्का’ची रक्कम आयातीच्या वेळी वस्तूंच्या मूल्यामध्ये धरण्यात आली नव्हती. ‘ओप्पो इंडिया’ कंपनीने 1 हजार, 408 कोटी रुपये बुडविले.
ओप्पो इंडिया’ कंपनीला ‘कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात करण्यात आली असून त्यात 4 हजार, 389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. कमी सीमाशुल्क भरल्याबद्दल रकमेतील तफावत अंशतः भरून काढण्यासाठी ‘ओप्पो इंडिया’ कंपनीने स्वयंस्फूर्तपणे 450 कोटी रुपये सरकारकडे जमा केले आहेत. नोटिसीद्वारे ‘ओप्पो इंडिया’ कंपनी, तिचे कर्मचारी तसेच ‘ओप्पो चीन’ या सर्वांना ‘सीमा शुल्क कायदा, 1962’ अन्वये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव आहे. ईडीने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये ही छापेमारी केली. याप्रकरणी सीबीआयही तपास करत आहे.
मनी लॉण्डरिंगप्रकरणी गोठविण्यात आलेल्या बँक खात्यांमधून व्यवहार करायचे असल्यास विवोने एका आठवडय़ात 950 कोटी रुपयांची बँक हमी भरावी असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. बँक खाती गोठविण्याचा आदेश रद्द केला जावा या मागणीसाठी विवोने याचिका सादर केली आहे. विवोने बँक खात्यांमधून व्यवहार करायला मिळावेत म्हणून विविध कारणे नमूद केली. खात्यांमधून रक्कम पाठविण्याबाबत केलेल्या व्यवहारांचा तपशील ईडीकडे सादर करावा, खाती गोठविण्यात आली तेव्हा 251 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम होती. तेवढा बॅलन्स कायम ठेवावा आणि पुढील आदेशापर्यंत ती रक्कम वापरू नये, असे आदेश न्यायालयाने दिले.
विवो या चिनी स्मार्टपह्न कंपनीवर ईडीच्या छाप्यामुळे हिंदुस्थानात चीनच्या हालचालींकडे लक्ष वेधले गेले आहे. शिओमीच्या छापेमारीत साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा पकडला गेल्यानंतर विवोवर हिंदुस्थानात ही कारवाई झाली. मनी लॉण्डरिंग आणि करचोरीच्या आरोपांव्यतिरिक्त असे समोर आले आहे की, ही कंपनी चिनी नागरिकांची बनावट ओळखपत्रेही तयार करत आहे. त्याच वेळी विवोचे दोन संचालक हिंदुस्थानातून फरार झाले.
सीमेवरील तणावामुळे टिकटॉकसारख्या 150 चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली, पण बहुतांश अॅप नव्या नावांनी पुन्हा ऑपरेट होताहेत. हिंदुस्थानात दोन लाख कोटीच्या व्यवसायात 72टक्के वाटा चीनचा आहे, तो वाढत आहे. मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱया उपकरणांच्या 12 हजार कोटी रु. च्या बाजारांतही 25 टक्के वाटा चीनचा झाला आहे.
जॉइंट व्हेंचर्सद्वारे चीनने करमणूकविश्वात स्थान निर्माण केले. सुरुवात 2019 च्या बीजिंग चित्रपट महोत्सवाने झाली. तीन चित्रपटांची सहनिर्मिती झाली. ‘चायना फिल्म असो.’ आणि ‘चायना फेडरेशन ऑफ लिटररी अॅण्ड आर्ट सर्कल’ने मिळून ‘इंडिया चाइना फिल्म सोसायटी’ स्थापन केली. चीनमध्ये काही हिंदुस्थानी फिल्मस्टार्सना चर्चेत आणले. सोशल मीडियात घुसखोरी खूप वेगाने झाली. ‘पॉकेट एफएम’ ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर चिनी कंपनीने 120 कोटी रु. गुंतवले आहेत. चीनच्या बाजूने हवा निर्माण करण्यासाठी ‘50 सेंट्स आर्मी’ आहे. तिचे लाखो सदस्य आहेत. चिनी पंपन्यांनी हिंदुस्थानी टेक स्पेसमध्ये 7 अब्ज डॉलरपेक्षा (55.5 हजार कोटी रु.) जास्त गुंतवले आहेत.
दिल्लीजवळ एका कॉलेजमध्ये चिनी अभ्यास केंद्र स्थापन झाले आहे. तेथे हिंदुस्थानी स्कॉलर्सना चिनी फेलोशिप दिली जाते आणि त्यांना चीनचा प्रवास घडवला जातो. त्यात श्वार्झमन स्कॉलरशिप, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्कॉलरशिप, ग्रेट वॉल फेलोशिप प्रमुख आहेत. हिंदुस्थानात चिनी पंपन्याच हेरगिरीचे शस्त्र ठरत आहेत. घुसखोरी प्रत्येक क्षेत्रात आहे. घरोघरी हेरगिरीचे जाळे पसरले आहे. ही चिनी घुसखोरी थांबवायला पाहिजे आणि आपणसुद्धा अशाच प्रकारची घुसखोरी चीन मध्ये इतर मित्र राष्ट्रांच्या द्वारे करायला पाहिजे. ‘हिंदुस्थानात प्रत्येक चिनी कंपनीला कायद्यानुसारच चालावे लागेल.’




























































