चीनचा व्हिएतनाम सीमेवर लष्करी तळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विस्तारवादी चीनने व्हिएतनाम सीमेनजीक आपला लष्करी तळ उभारल्याचे उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांनी स्पष्ट झाल्याने दक्षिण चीन समुद्रातील तणाव अधिकच वाढला आहे. व्हिएतनाम सीमेपासून वीस किलोमीटर अंतरावर हा तळ जवळपास पूर्ण क्षमतेने तयार झाल्याचे उपग्रहीय छायाचित्रांतून दिसत आहे. चीनच्या ग्वांक्शी प्रांतातील निंगमिंग काउंटीमध्ये हा तळ आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरचा तळही उभारला जात असल्याची माहिती आहे. लष्करी धावपट्टीवर सहा लाँचर दिसत आहेत. चीनच्या हवाई दलाच्या बॉम्बर्सनी दक्षिण चीन समुद्रात ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट स्ट्राइक ग्रुप’वर मॉक हल्ला केल्याची घोषणा चीनने केल्यानंतर आठवडाभरात हे वृत्त समोर आले आहे. ‘साउथ चायना सी न्यूज’ या ‘एनजीओ’ने यासंदर्भात उपग्रहीय छायाचित्रे ट्विट केल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात येईल, असे व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.