
पुरापतखोर चीनकडून अरुणाचल सीमेपासून 800 किलोमीटरवर सीव्रेट साईटचे काम सुरू आहे. येथे अणुबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. चीनच्या ‘स्पह्टक’ कारवायांमुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे.
अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्प टाइम्स’ने ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील शिचुआन प्रांतातील जिटोंग आणि पिंगटोंग येथील सॅटेलाइट इमेजचे विश्लेषण करून येथे चीनकडून अणुबॉम्ब निर्मितीचे काम वेगाने सुरू असल्याचे म्हटले आहे.
अरुणाचलपासून 800 कि. मी.वर
चीनकडून अनेकदा अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न झाला. अणुबॉम्ब निर्मितीचे ठिकाण अरुणाचलच्या सीमेपासून 800 किलोमीटरवर आहे. यामुळे भविष्यात हिंदुस्थानची चिंता वाढणार आहे.
2030 पर्यंत 1000 पेक्षा जास्त अणुबॉम्ब असतील
गेल्या दहा वर्षांत चीनने आपला अणु कार्यक्रम वेगाने वाढविला आहे. जगात सर्वाधिक 5400 अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. त्यापाठोपाठ अमेरिकेजवळ 5100 ते 5200 अणुबॉम्ब आहेत. सध्या चीनकडे 600 अणुबॉम्ब आहेत. 2030 पर्यंत चीनकडे 1000 पेक्षा जास्त अणुबॉम्ब असतील, असे ‘न्यूयॉर्प टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.
डोंगर-दरी, दुर्गम भागात बंकर्स, कारखाना आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा
चीनने सहा शतकांपूर्वी शीतयुद्धाच्या काळात अणुबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम सुरू केला. चीनचे नेते माओत्से तुंग यांच्या ‘थर्ड प्रंट’ कार्यक्रमांतर्गत संरक्षण उद्योगाला समुद्राजवळील भागातून दुर्गम, डोंगराच्या भागात हलविण्यात आले. अमेरिका आणि तत्कालीन सोविएत युनियनच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा यामागे उद्देश होता. डोंगर, दऱया आणि अतिशय दुर्गम भागात चीनने बंकर्स उभारले. अणुबॉम्ब बनविण्याचा कारखाना, प्रयोगशाळा सुरू केली. 1980च्या दशकात तणाव कमी झाल्यानंतर येथील प्रयोगशाळा बंद करून 2019 पासून शिचुआन प्रांतात प्रयोगशाळा, कारखाना निर्माण करून अणुबॉम्ब बनविण्याचे काम सुरू केले आहे. हा दुर्गम भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून 800 किलोमीटरवर आहे.
























































