
चीनची मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटी (एमएसएस) ही आता जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था बनली आहे. या संस्थेने मोसाद, रॉ आणि सीआयएसारख्या गुप्तचर संस्थांनाही मागे टाकले आहे. ही संस्था काऊंटर इंटलेजिन्स, राजकीय सुरक्षा, विदेशी माहिती मिळवणे, सायबर माहिती मिळवण्यात तरबेज असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या सीआयए आणि ब्रिटनमधील एम16 पेक्षा पॉवरफुल असून या संस्थेत जवळपास 6 लाख कर्मचारी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शी जिनपिंगच्या काळात या संस्थेला जास्त पाठबळ मिळाले आहे.