अॅपने केला विकास…शिक्षणाची सोपी वाट: पालघरचे चिंचणी गाव झाले स्मार्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पालघर

संपूर्ण देशात स्मार्ट सिटीचे ढोल बडवले जात असताना आणि अनेक महापालिका डिजिटल होण्याचा प्रयत्न करत असताना पालघर जिह्यातील चिंचणी गावाने चक्क स्वतःचे अॅप सुरू केले आहे. ग्रामपंचायत, महिला बचतगट तसेच डायमेकर, स्वयंरोजगार, पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे, श्रद्धा स्थळे, वाचनालय इत्यादी माहिती या अॅपवर असून गावात झालेल्या या डिजिटल क्रांतीमुळे चिंचणी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. अशाप्रकारे स्मार्ट अॅप सुरू करणारे चिंचणी हे गाव महाराष्ट्रातील पहिलेच असून ते आता इतर गावांसाठी प्रेरणा ठरणार आहे.

चिंचणी हे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले डहाणू तालुक्यातील गाव. या गावात मच्छीमार, शेतकरी, आदिवासी बांधव तसेच डायमेकर यांसारखे व्यवसाय करणारे आहेत. मात्र शेतीमधून मिळणारे उत्पन्न वाढावे व डायमेकिंगचा व्यवसाय जगभर पसरावा यासाठी येथील सरपंच कल्पेश धोडी यांनी स्मार्ट अॅप बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी डीजीमाईड कंपनीचे सीईओ योगेश साहू व अमेरिकेचे टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर रजनीश बाजपेई यांची मदत घेतली.