हिंदुस्थानच्या ताब्यात चीनचा सैनिक, अंधाराचा केला बहाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

लडाखमध्ये पँगॉंग सरोवराजवळ सीमारेषा पार करणार्‍या एका चीनच्या सैनिकाला हिंदुस्थानी जवानांनी ताब्यात घेतले आहे. हिंदुस्थानी माध्यमात हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चीननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अंधार आणि कठीण भौगोलिक जागा असल्याने हा सैनिक रस्ता विसरला होता असे कारण चीनने दिले आहे. आपल्या सैनिकाला तत्काळ सोडावे अशी मागाणी चीनने केली आहे.    

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फ्रंटियर फोर्सचा एक सैनिक बेपत्ता आहे. हा सैनिक बेपत्ता झाल्यानंतर चीनने हिंदुस्थानकडे मदत मागितली आहे. दोन तासांतर हा सैनिक आपल्या ताब्यात असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे. लवकरच या सैनिकाला चीनकडे पाठवण्यात येईल.

ग्लोबल टाईम्सनुसार चीनचा सैनिक पाठवून हिंदुस्थानने दोन्ही देशांती शांतता प्रस्थापित करण्यास मदत करावी. तसेच हिंदुस्थानी माध्यमांत अशा प्रकारच्या घटनांन मीठ मसाला लावून सादर केले जाते असेही ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.