मुलांनो आता ऐका ‘चिंटुकल्या गोष्टी’! सुट्टीत बच्चे कंपनीसाठी कथांचा खजिना

‘कोणे एके काळी’, ‘खरंच का!’, ‘सूत उवाच’, ‘धप्पा कुट्टी’, ‘मिष्टी-डून’, ‘बेड टाईम स्टोरीज’, ‘ब्रश ब्रश स्टोरीज,’ ‘यार, नक्की कसं कागायचं?’ अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ‘चिंटुकल्या गोष्टी’मध्ये ऐकायला मिळतील. ‘अटकमटक’ हा लहान मुलांसाठी काम करणारा समूहदेखील ‘स्नॉवेल’सोबत जोडला जात आहे.

लहान मुलांसाठी ‘चिंटुकल्या गोष्टी’चा खजिना आता खुला झाला आहे. आपणा सर्वांचा लाडका ‘चिंटू’ आता ऑडियोच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. ऑडियो बुक्स आणि श्राक्य माध्यमात काम करणाऱया स्नॉवेलच्या ऍप आणि वेबसाईटवर ‘चिंटुकल्या गोष्टी’ हा स्वतंत्र विभाग आजपासून सुरू झाला आहे. या उपक्रमात ‘चिंटू’ या अत्यंत लोकप्रिय चित्रमालिकेचे लेखक, चित्रकार चारुहास पंडित हे सहभागी झाले आहेत. चिंटूच्या विश्वातल्या वेगवेगळ्या गोष्टी ‘चिंटुकल्या गोष्टी’मध्ये विनाशुल्क ऐकायला मिळतील.

याशिवाय पौराणिक कथा, लोककथा, मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱया गोष्टी, पऱयांच्या राज्यात घेऊन जाणाऱया गोष्टी, आजीच्या लहानपणीच्या गोष्टी, जिज्ञासा-कुतूहल निर्माण करणाऱया गोष्टी, निसर्ग, विज्ञान, प्राणी यांच्या मजेदार गोष्टी हे सगळं असेल.

सध्याच्या काळ कठीण आहे. मुले घरातून अभ्यास करत आहेत. त्यांचा क्रीन टाईम वाढतोय. तो आणखी न वाढवता मुलांना छान गोष्टी ऐकता याव्यात, हा आमचा उद्देश आहे. आपली पिढी गोष्टी ऐकत मोठी झालीय. नवीन तंत्राचा आधार घेऊन ही परंपरा पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे.
– अनिरुद्ध जोशी, स्नॉवेल

आपली प्रतिक्रिया द्या