
चिपळूण नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पाच उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे विजयी झाल्या आहेत. तसेच शिवसेनेचे अजय भालेकर हे प्रभाग 4 अ मधून 1292 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी आशीष खातू यांचा 369 मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.4 बमधून शिवसेना पक्षाच्या उमेदवार वैशाली कदम यांना 1196 मते मिळाली. त्यांनी सुरैया फकीर यांचा 161 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्र.6 बमधून शिवसेनेच्या संजय गोताड यांना 461 मते मिळाली. त्यांनी विष्णू लाणे यांचा 5 मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.14 अ मधून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे यांना 1016 मते मिळाली. त्यांनी शीतल रानडे यांचा 135 मतांनी पराभव केला. बमधून मिथिलेश ऊर्फ विक्की नरळकर यांना 1179 मते मिळाली. त्यांनी सुयोग चव्हाण यांचा 69 मतांनी पराभव केला.



























































